जपतलाई आश्रमशाळा सर्पदंश प्रकरण; संस्था सचिव विश्वजीत कोवासे अटकेत

110

जपतलाई आश्रमशाळा सर्पदंश प्रकरण; संस्था सचिव विश्वजीत कोवासे अटकेत
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. २० : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या गंभीर प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात कुपारलिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक संशोधन संस्था, गडचिरोलीचे सचिव तथा गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे विद्यमान जिल्हाध्यक्ष ॲड. विश्वजीत कोवासे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
विश्वजीत कोवासे यांना शनिवारी गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला आता वेग येण्याची शक्यता आहे.
घटनेनंतर पोलिसांनी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, अधीक्षिका, अधीक्षक तसेच संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यापूर्वी या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली होती. मात्र संस्थेचे अध्यक्ष तथा माजी खासदार मारोतराव कोवासे, सचिव विश्वजीत कोवासे आणि अधीक्षिका हे फरार होते.
दरम्यान, तिघांनीही अटकपूर्व जामिनासाठी गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालय तसेच नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने तिघांचेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले. त्यानंतर पोलिसांनी विश्वजीत कोवासे यांना अटक केली.
विश्वजीत कोवासे यांच्या अटकेनंतर या प्रकरणातील तपासाला महत्त्वाचे वळण मिळाले असून, संस्था अध्यक्ष मारोतराव कोवासे आणि अधीक्षिकेच्या अटकेकडे आता लक्ष लागले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here