गडचिरोलीत तंबाखू तस्करांचा डाव उधळला; 45 लाखांचा मुद्देमाल जप्त

37

गडचिरोलीत तंबाखू तस्करांचा डाव उधळला; 45 लाखांचा मुद्देमाल जप्त
– एकाला अटक, दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू
The गडविश्व
गडचिरोली, दि.१७ : प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रकवर स्थानिक गुन्हे शाखा व आरमोरी पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. कुरखेडा–आरमोरी मार्गावर 16 सप्टेंबर रोजी सापळा रचून ट्रक पकडण्यात आला. या कारवाईत सुगंधित तंबाखूसह ट्रक असा एकूण 45 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी ट्रकमधून प्रतिबंधित तंबाखू किंमत सुमारे 30 लाख 20 हजार व वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेले ट्रकची किंमत 15 लाख रुपये असा एकूण ४५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वाहनचालक शाहु धर्मेशकुमार इंदेरमन (28, रा. जोशीलमती, गेंदाटोला, जि. राजनांदगाव, छत्तीसगड) याला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने हा माल टेमन बेदराम साहू याचा असल्याचे सांगितले. अन्न सुरक्षा अधिकारी सुरेश तोरेम यांच्या फिर्यादीवरून आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण फगडे व आरमोरी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन झनक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रताप लामतुरे करीत आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #crimenews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here