गडचिरोलीतील युवकांसाठी नोकरीची ‘मेगा संधी’! ४०० हून अधिक जागांसाठी रोजगार मेळावा

33

गडचिरोलीतील युवकांसाठी नोकरीची ‘मेगा संधी’! ४०० हून अधिक जागांसाठी रोजगार मेळावा
– Tata Motorsसह तीन नामांकित कंपन्यांची भरती ; ITI, डिप्लोमा व पदवीधरांना थेट रोजगाराची संधी
The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगार युवकांसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली CIIIT (Centre for Invention, Innovation, Incubation and Training), गडचिरोली येथे १३ ऑगस्ट रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. टाटा टेक्नॉलॉजीज, गोंडवाना विद्यापीठ आणि कौशल्य विकास विभाग, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने गोंडवाना विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये हा मेळावा होणार आहे.
या रोजगार मेळाव्यात ४०० हून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध असून, Tata Motors – पुणे, Axis Global – चेन्नई आणि Azad Engineering – हैदराबाद या नामांकित कंपन्यांचा सहभाग राहणार आहे. ऑटोमोबाईल, अभियांत्रिकी, उत्पादन, CNC ऑपरेशन आणि औद्योगिक सेवा क्षेत्रातील विविध पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
Tata Motors – पुणे येथे अप्रेंटिसशिप आणि ट्रेनी पदांसाठी १५० हून अधिक जागा असून ITI, डिप्लोमा व पदवीधर उमेदवारांना संधी मिळणार आहे. वेतन १५ ते २० हजार रुपये राहणार आहे.
Axis Global – चेन्नई येथे GET, DET आणि सर्व्हिस इंजिनिअर पदांसाठी ९० जागा उपलब्ध असून वेतन १६ ते २२ हजार रुपये आहे.
Azad Engineering – हैदराबाद येथे CNC ऑपरेटर, प्रोग्रामर आणि ट्रेनी पदांसाठी १५० हून अधिक जागा असून वेतन १५ ते २२ हजार रुपये राहणार आहे.

या मेळाव्यामुळे गडचिरोलीतील युवकांना थेट नामांकित औद्योगिक कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी मिळणार असून, ऑटोमोबाईल उत्पादन, CNC ऑपरेशन, अभियांत्रिकी सेवा, तांत्रिक सहाय्य, देखभाल आणि उत्पादन क्षेत्रात करिअरची नवी दारे खुली होणार आहेत.
ITI, डिप्लोमा तसेच पदवीधर पात्र उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. नोंदणीसाठी https://tinyurl.com/CIIIT-Placement या लिंकवर जाऊन ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
कौशल्य विकास आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील दुवा मजबूत करण्यासोबतच जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने हा रोजगार मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here