दहावीत ८६ टक्के गुणांची भरारी ; अनुराग मडावी यांचा जागतिक आदिवासी दिनी गौरव

23

दहावीत ८६ टक्के गुणांची भरारी ; अनुराग मडावी यांचा जागतिक आदिवासी दिनी गौरव
The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : दहावीच्या शालांत परीक्षेत ८६ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या अनुराग हरीष मडावी यांचा जागतिक आदिवासी दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशन, जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
९ ऑगस्ट रोजी आयोजित या कार्यक्रमात अनुराग यांच्या शैक्षणिक यशाची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या यशामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात सातत्याने मेहनत घेण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. मिलिंद नरोटे होते. त्यांच्या हस्ते अनुराग मडावी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशनचे पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना अनुराग मडावी यांनी आपल्या यशाचे श्रेय वर्गशिक्षक, गुरुजन आणि पालकांच्या मार्गदर्शनाला दिले. नियमित अभ्यास, योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण मेहनत यामुळे यश मिळवता येते, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
अनुराग यांच्या यशाबद्दल उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here