स्वच्छतेच्या योद्ध्यांचा सन्मान ; टीबी रुग्णांना प्रोटीन किटचे वितरण

118

स्वच्छतेच्या योद्ध्यांचा सन्मान ; टीबी रुग्णांना प्रोटीन किटचे वितरण
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. २३ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा महोत्सव २०२६’ अंतर्गत धानोरा येथे सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम उत्साहात पार पडले. आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्तव्य कक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला, तर टीबी रुग्णांना प्रोटीन किटचे वितरण करून त्यांच्या आरोग्याला आधार देण्यात आला.
यावेळी शहर स्वच्छ व निरोगी ठेवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना टी-शर्ट व रेनकोट भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचा सन्मान केला.
याच कार्यक्रमात क्षयरोग (टीबी) रुग्णांच्या पोषणाची गरज लक्षात घेऊन त्यांना प्रोटीन किटचे वाटप करण्यात आले. रुग्णांच्या आरोग्य सुधारण्यासाठी आणि उपचारांना बळ मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. सेवा महोत्सवाच्या माध्यमातून स्वच्छतेचा सन्मान, आरोग्याची जपणूक आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित करणारा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here