पेपरफुटीच्या वादानंतर NEET UG 2026 परीक्षा अखेर रद्द ; देशभरात खळबळ

65

पेपरफुटीच्या वादानंतर NEET UG 2026 परीक्षा अखेर रद्द ; देशभरात खळबळ
– २२ लाख विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागणार परीक्षा ; फेरपरीक्षा जून-जुलैमध्ये होण्याची शक्यता
The गडविश्व
नागपूर, दि. १२ : देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG 2026 पेपरफुटीच्या गंभीर आरोपांनंतर अखेर रद्द करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) घेतलेल्या या मोठ्या निर्णयामुळे देशभरात खळबळ उडाली असून लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य पुन्हा एकदा अनिश्चिततेच्या छायेत गेले आहे.
३ मे २०२६ रोजी झालेल्या परीक्षेच्या आधीच प्रश्नपत्रिका लीक झाल्याचे धक्कादायक वास्तव तपासात समोर आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले. पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SOG) केलेल्या चौकशीत परीक्षेच्या तब्बल ४२ तास आधीच प्रश्नपत्रिका टेलिग्राम आणि व्हॉट्सॲपवर फिरत असल्याचे उघड झाल्याचे समजते.
दरम्यान, NTA ने स्पष्ट केले आहे की रद्द करण्यात आलेली परीक्षा पुन्हा घेण्यासाठी नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. विद्यार्थ्यांना यासाठी पुन्हा नोंदणी करण्याची किंवा नवीन शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. यावेळी आधीचेच प्रवेशपत्र (Admit Card) आणि केंद्र निवडीचा डेटा ग्राह्य धरला जाणार आहे.
सध्याच्या माहितीनुसार, ही फेरपरीक्षा जून किंवा जुलै 2026 मध्ये घेण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निर्णयामुळे देशभरातील २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षा द्यावी लागणार असून त्यांच्या तयारीवर आणि मानसिकतेवर मोठा परिणाम झाला आहे.https://cdnbbsr.s3waas.gov.in/s37bc1ec1d9c3426357e69acd5bf320061/uploads/2026/05/202605122066418251.pdf
#thegdv #thegadvisha #gadchirolinew #neetexam2026 #English #EnglishNews #BreakingNews #EducationNews #ExamAlert #NEET2026 #IndiaNews #StudentNews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here