रांगीत सांस्कृतिक कार्यक्रमांनी ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा

62

रांगीत सांस्कृतिक कार्यक्रमांनी ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०९ : तालुक्यातील रांगी येथील ग्रामपंचायत सभागृहात सौ. तनुजा महेंद्र काटेंगे यांच्या पुढाकारातून ९ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महिला महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महिलांनी विविध गीते, नृत्य आणि सांस्कृतिक सादरीकरण करून उपस्थितांचे लक्ष वेधले.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. ज्योतीताई शशिकांत साळवे होत्या, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून गडचिरोली महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा सुरेखाताई बारसागडे उपस्थित होत्या.
मंचावर प्रमुख अतिथी म्हणून जांगदा ग्रामपंचायतीच्या सरपंच रसिकाबाई पोरेटी, रांगी ग्रामपंचायतीच्या सरपंच फालेश्वरी प्रदीप गेडाम, ग्रामविकास अधिकारी मकरंद बांबोळे, मोहली ग्रामपंचायतीच्या सरपंच अंबिका पुगांटे, कन्न्हाळगावच्या सरपंच मंगला बोगा यांच्यासह वैशाली काटेंगे, हसीना काटेंगे, मीनाक्षी काटेंगे, प्रनाली काटेंगे, प्रेमिका हलामी (सदस्या, आविका रांगी), मीराबाई होळी, प्रिया कुनघाटकर, रीना भुरसे, सुनीता कुमरे, रीना गडपायले, सविता भोयर, लताबाई काटेंगे, विजया हलामी (माजी सरपंच, रांगी), अंतकला दुगा, कमलताई बोरसरे (माजी ग्रामपंचायत सदस्या) आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवानिवृत्त शिक्षक महेंद्र काटेंगे यांनी केले, तर आभार ग्रामपंचायत सदस्य दिनेश चापडे यांनी मानले. कार्यक्रमाला गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहून महिला दिनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here