भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी शेकापची निर्णायक लढाई : भाई रामदास जराते
– धन्नूर येथे आठवी तालुका बैठक, संघटनात्मक विस्ताराला गती
The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : जिल्ह्यात खाणी व लोह प्रक्रिया प्रकल्पांच्या नावाखाली जंगल व शेतकऱ्यांच्या जमिनी दंडुक्याच्या जोरावर बळकावण्याचे प्रयत्न वाढले असून मुठभर भांडवलदारांच्या नफ्यासाठी स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय केला जात आहे. या अन्यायाविरोधात शेतकरी कामगार पक्ष सातत्याने आवाज उठवत आला असून यापुढे भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी व्यापक व निर्णायक लढा उभारला जाईल, अशी ग्वाही पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी दिली.
मुलचेरा तालुक्यातील धन्नूर पर्यटन तलाव केंद्र येथे शनिवारी पक्षाची आठवी संघटनात्मक बैठक उत्साहात पार पडली. यावेळी बोलताना जराते यांनी प्रशासन व प्रकल्पग्रस्त धोरणांवर टीका करत स्थानिकांच्या संमतीशिवाय कोणताही विकास प्रकल्प राबविणे अन्यायकारक असल्याचे स्पष्ट केले. जंगल, जमीन आणि जलस्रोतांवर पहिला हक्क भूमिपुत्रांचाच असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
बैठकीला महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, महिला जिल्हाध्यक्षा कविता ठाकरे, तालुकाध्यक्ष चिरंजीव पेंदाम, जिवनकला कुसनाके, कल्पना सडमाके यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत संघटनात्मक बळकटीसाठी मुलचेरा तालुका समितीचा विस्तार करण्यात आला. तालुका समिती सदस्य म्हणून शांताराम तोडसाम, मिथुन कुळमेथे, किर्तीमंतराव आत्राम, कार्तिक पिल्लेलवार, मधुकर आत्राम, भैय्याजी कडते, मनोज सिडाम, दिलीप मेश्राम, रुपाली रामटेके, कालिदास चौधरी, साईनाथ उरेते, महेंद्र आत्राम, अनिल गावळे, विष्णू मिस्त्री, ईश्वर आलाम, नरेश गोमासे, नान्टू मिस्त्री, शंकर रामटेके, निलकंठ आत्राम, पवित्र सम्मदार, सुरज मडावी व विनोद कन्नाके यांची निवड जाहीर करण्यात आली.
दरम्यान, पत्रू नैताम, प्रदीप सेडमाके, अशोक सिडाम, सदाशिव कुळमेथे, भास्कर मडावी, महेंद्र रामटेके, काशिनाथ मडावी, राम वेलादी, श्रीराम आत्राम, रवींद्र मडावी, नारायण पेंदाम, भगवान आत्राम, साईनाथ मडावी, अक्षय सेडमाके, मोहनदास कुसनाके, भैय्याजी सेडमाके, अंबादास कुसनाके, साईनाथ सेडमाके, रवींद्र वनकर, साई बर्लावार, भैय्याजी नैताम, महेश मडावी, रमेश गावळे, संतोष मडावी व सत्यजित रॉय यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.














