गडचिरोली : ट्रॅक्टरवरील कारवाई टाळण्यासाठी लाच, वन विभागाचा क्षेत्र सहायक एसीबीच्या जाळ्यात

114

गडचिरोली : ट्रॅक्टरवरील कारवाई टाळण्यासाठी लाच, वन विभागाचा क्षेत्र सहायक एसीबीच्या जाळ्यात
The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : वनजमिनीवर अवैध काम केल्याचा आरोप करून जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टरवरील दंड कमी करून गुन्हा दाखल न करण्यासाठी लाच मागणाऱ्या सिरोंचा वन विभागातील क्षेत्र सहायकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गडचिरोली पथकाने रंगेहाथ अटक केल्याची कारवाई बुधवार २१ जानेवारी कमलापुर वनपरिक्षेत्राअंतर्गत राजाराम (खां) उपक्षेत्रात करण्यात आली.
महेश जयंतराव धामनगे (वय ४७) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार तेलंगणा राज्यातील असून तो काकांच्या ट्रॅक्टरने शेतकऱ्यांच्या शेतीची मशागत करत होता. यावेळी वन कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर जप्त केल्यानंतर, धामनगे यांनी संपर्क साधून दंड कमी करून प्रकरण मिटवण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती अखेर १० हजार घेण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर पंचांसह सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे लाच स्वीकारताना धामनगे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध राजाराम (खां) उपपोस्ट येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून राजाराम (खां) व चंद्रपूर येथील त्याच्या निवासस्थानी झडती घेण्यात आली.
ही कारवाई नागपूर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक दिगंबर प्रधान, अपर पोलिस अधीक्षक माधुरी बाविस्कर व विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नक्षलप्रभावित भागात झालेल्या या धडक कारवाईमुळे वन विभागात खळबळ उडाली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #acb #crimenews #forest #ACBTrap #BriberyCase #ForestDepartment #Gadchiroli #Corruption #AntiCorruption #GovernmentOfficer #LawAndOrder

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here