जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा येथील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर

86

जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा येथील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर
– आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या पुढाकारातून नवीन बोरवेल मंजूर
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २४ : धानोरा येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये आजूबाजूच्या परिसरातून 500 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून, शाळेत पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही बाब आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या शाळा भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी थेट त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी तात्काळ निर्णय घेत नवीन बोरवेल मंजूर केला आणि विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला. त्यांच्या या संवेदनशील, तत्पर आणि विद्यार्थीहितैषी निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आज या बोरवेलचे भूमिपूजन करून प्रत्यक्ष खोदकामास सुरुवात करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष साजन गुंडावार, भाजपा जिल्हा सचिव सारंग साळवे, भाजपा महामंत्री सुभाषजी धाईत, मुकुल बोडगेवार, शाळा समिती अध्यक्ष वेणूताई मशाखेत्री, प्रभारी मुख्याध्यापक पी. व्ही. साळवे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष जमीर कुरेशी, शाळेतील शिक्षक-शिक्षिका तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजांसाठी नेहमीच तत्पर असलेल्या आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांचे शाळा व्यवस्थापन समिती, शाळेतील कर्मचारीवर्ग आणि विद्यार्थ्यांनी मनःपूर्वक आभार मानले. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून शाळेच्या दैनंदिन कामकाजाला मोठा दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here