कुरखेडा : अल्पशा आजाराने वच्छलाबाई इसकापे यांचे दुःखद निधन
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १३ : तालुक्यातील कुंभीटोला येथील रहिवासी आणि महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेले मनोज एकनाथ इसकापे यांच्या मातोश्री सौ. वच्छलाबाई एकनाथ इसकापे (वय ७०) यांचे आज, शनिवार, दि. १३/१२/२०२५ रोजी दुपारी २ वाजता अल्पशा आजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले. कुंभीटोला येथे झालेल्या या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पार्थिव शरीरावर उद्या रविवार, दि. १४/१२/२०२५ रोजी सकाळी ९ वाजता कुंभीटोला येथील सती नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी आणि नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे. शोकाकुल परिवाराच्या दुःखात ग्रामस्थ व मित्रपरिवार सहभागी झाले आहेत.













