गोंडी नृत्यातून आदिवासी संस्कृती जोपासण्याचे कार्य : चांगदेव फाये
– सोनेरांगी टोला येथे गोंडी नृत्य स्पर्धेचे उद्घाटन
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १३ : गोंडी नृत्य हे अत्यंत लोकप्रिय असून या नृत्याच्या माध्यमातून सामाजिक संदेश देत आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य होत आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये यांनी केले.
ते सोनेरांगी टोला येथे बहुउद्देशीय गोटूल समितीच्या वतीने आयोजित केलेल्या विरांगण राणी दुर्गावती मडावी सल्ला गांगरा शक्तीचे आदिवासी देवी-देवतांच्या महापूजन कार्यक्रमादरम्यान झालेल्या गोंडी नृत्य स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी उदघाटक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन पाटील नाट हे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी जि. प. सदस्य भाग्यवानजी टेकाम, माजी जि. प. सदस्य प्रभाकर तुलावी, दिलाराम मानकर, माजी पंस सदस्य गजानन कुंमरे, प्रा. बावणकर, जयंत निंबेकर, तनुजा तुलावी, हिराकन्या उसेंडी, मीनाताई कोरचा, उपसरपंच गुरुदेव नीकोडे, सेवाभाऊ सहारे, रोहित आकरे, शालिकराम जणबंधू, नलेश्वर आदे, तसेच सामाजिक कार्यकर्ते दर्रो व विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष जीवन नाट, प्रभाकर तुलावी, भाग्यवान टेकाम आणि दिलाराम मानकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात पोलीस पाटील तनुजाताई तुलावी, अंगणवाडी सेविका हिरकण्या उसेंडी, अंगणवाडी सेविका मीनाबाई कोर्चा आणि उपसरपंच गुरुदेव निकोडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय कुंमरे यांनी केले, तर सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार रमेश मडावी यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष भोजराज हुर्रे यांच्यासह मधुकर मडावी, निंबाजी हुर्रे, ईश्वर मडावी, सुरेश मडावी, हिराजी मडावी, रोशन कुमरे, नानाजी मडावी, रवींद्र हुर्रे, मणिराम उसेंडी, मिथुन मडावी, प्रेम हुर्रे तसेच गावातील नागरिक, युवक आणि महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.













