खड्ड्यांनी गिळला तळेगाव–कुरखेडा रस्ता ; १५ डिसेंबरला PWD कार्यालयासमोर रस्तारोको

101

खड्ड्यांनी गिळला तळेगाव–कुरखेडा रस्ता ; १५ डिसेंबरला PWD कार्यालयासमोर रस्तारोको
– आम आदमी पार्टीचा इशारा
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. १२ : तळेगाव–कुरखेडा हा १५ हून अधिक गावांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता गेल्या वर्षभरापासून खड्ड्यांच्या खाईत कोसळला असून, या दुरवस्थेला कंटाळलेल्या नागरिकांसह आम आदमी पार्टीने १५ डिसेंबर रोजी PWD कार्यालयासमोर रस्तारोको–ठिय्या आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे. रस्त्यावर दुरुस्तीऐवजी मोठे बोल्डर टाकून वाहतूक बंद केल्याने नागरिकांचा रोजचा प्रवास जीवघेणा बनला आहे.
कृषी, शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेला हा मार्ग पूर्णपणे उध्वस्त झाल्याने ग्रामीण भागात अक्षरशः अराजक स्थिती निर्माण झाली आहे. शेतमाल वाहतूक ठप्प, विद्यार्थ्यांची शाळाकडे धावणे कठीण, तर रुग्णवाहिका खड्ड्यांत अडकून रुग्णांच्या जीवावर बेतणारी संकटे अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
अशा परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मात्र ‘निधीअभावी काम रखडले… कंत्राटदाराला मुदतवाढ दिली आहे’ असा पोकळ दावा करण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कंत्राटदाराने काम अर्धवट सोडले असून, शासनाच्या दोन वर्षांच्या मुदतवाढीच्या आडोश्यावर काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. याचा फटका मात्र थेट सामान्य नागरिकांना बसत आहे.या प्रकरणाविरोधात नागरिकांचा राग दिवसेंदिवस तीव्र होत असून अलीकडच्या ग्रामसभा व बैठकींमध्ये आंदोलनाची मागणी जोर धरत होती. अखेर नागरिकांच्या भावना ओळखून आम आदमी पार्टी पुढे सरसावली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष नसिर हाशमी यांनी चेतावणी देत स्पष्टपणे म्हटले आहे की, १४ डिसेंबरपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही, तर १५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता PWD कार्यालयासमोर हजारो नागरिकांसह रस्तारोको–ठिय्या आंदोलन करू. गरज पडल्यास हा रस्ता पूर्ण जाम करू. ‘शासनाच्या निष्क्रियतेमुळे गावकऱ्यांचे जीव धोक्यात आहेत. आता शांत बसणार नाही. सर्व पीडित गावकऱ्यांनी १५ तारखेला मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
आता प्रशासन जागे होऊन तातडीचे निर्णय घेते की नागरिकांचा उद्रेक उफाळून रस्ते ठप्प होतात याचा फैसला १५ डिसेंबरलाच होणार आहे.
#thegdv #thegadvishva #thegadvishva #gadchirolinews #kurkhedanews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here