आणखी २१ माओवाद्यांचे आत्मसमर्पण ; महिला माओवादींचा मोठा सहभाग
– चार DVCM, नऊ ACM व आठ सदस्यांचा समावेश
The गडविश्व
विशेष प्रतिनिधी /कांकेर (छत्तीसगड), दि. २६ : छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात आज २१ माओवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये उत्तर बस्तर डिव्हिजनअंतर्गत नॉर्थ सब झोनल ब्युरोमध्ये सक्रिय असलेले या सर्व माओवाद्यांनी आज कांकेर येथे पोलिस आणि प्रशासनासमोर आत्मसमर्पण केले.
DVCM, ACM अशा उच्च पातळीवरील कॅडरच्या माओवादींचा समावेश असून, DVCM सेक्रेटरी ‘मुकेश’ यानेही आत्मसमर्पण केले आहे. या २१ माओवाद्यांमध्ये ८ पुरुष आणि १३ महिला माओवादी सहभागी आहेत.https://x.com/ANI/status/1982438271746531437?s=19
हे सर्व माओवादी केशकाल डिव्हिजन, कुएमारी व किसकोडो एरिया कमिटीच्या अंतर्गत कार्यरत होते. त्यांनी आपल्या सोबत ३ एके-४७, ४ एसएलआर, २ इंसास, ६ थ्री-नॉट-थ्री रायफल, २ सिंगल-शॉट रायफल आणि १ बीजीएल लॉन्चर अशा एकूण १८ अत्याधुनिक शस्त्रांसह शरणागती पत्करली आहे. https://x.com/ANI/status/1982441829380325729?s=19
या आत्मसमर्पणामुळे उत्तर बस्तर डिव्हिजनमधील इंद्रावती एरिया कमिटीचा माड डिव्हिजन आता जवळपास रिकामा झाला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
शासनाच्या पुनर्वसन योजनांचा लाभ घेत हे सर्व माओवादी आता शांततेच्या आणि विकासाच्या प्रवाहात सहभागी होणार आहेत. या घटनेमुळे सुरक्षा दलांचा मनोबल उंचावला असून, या भागातील नक्षलविरोधी मोहिमेला नवे बळ मिळाले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Chhattisgarh #Kanker #NaxalSurrender #Bastar #SecurityForces #AntiNaxalOperation #Maoist #PeaceProcess #Development #NaxaliteSurrender #IndianPolice #AK47 #SLR #INSAS #BGL #WomenMaoists #Rehabilitation #Mainstreaming #NorthBastar #IndravatiDivision














