कुरखेडा : तीव्र उतार, अरुंद रस्ता व खोल खंदक – सतीनदी पूलाचा पोचमार्ग ठरत आहे धोकादायक

136

कुरखेडा : तीव्र उतार, अरुंद रस्ता व खोल खंदक – सतीनदी पूलाचा पोचमार्ग ठरत आहे धोकादायक
– तातडीच्या उपाययोजनांची मागणी
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २४ : शहराजवळील सतीनदीवरील निर्माणाधीन पूल तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर दुचाकी वाहतुकीसाठी खुला झाला असला, तरी तात्पुरता तयार केलेला पोचमार्ग प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. तीव्र उतार, अरुंद रस्ता आणि बाजूला खोल खंदक असल्याने या मार्गावरून दुचाकी घसरल्यास मोठा अपघात घडू शकतो, अशी चिंता व्यक्त होत आहे.
सदर पूलाच्या बांधकामामुळे मागील तीन महिने कुरखेडा–कोरची मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना तालुका मुख्यालय गाठण्यासाठी तब्बल १५ ते २० किलोमीटरचा फेरा मारावा लागत होता. मालदूगी–वाघेडा–आंधळी या खडतर व खड्डेमय रस्त्याने प्रवास करावा लागत असल्याने नागरिकांचा त्रास वाढला होता. पुलाचा स्लॅब पूर्ण होताच दुचाकी वाहतूक सुरू झाली; मात्र सध्याच्या पोचमार्गामुळे प्रवासी कायम भीतीत आहेत.
आज माजी नगराध्यक्ष तथा भाजप जिल्हा महामंत्री रवींद्र गोटेफोडे आणि रुग्ण कल्याण समिती सदस्य विवेक निरंकारी यांनी स्थळाला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांनी प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली. “उताराची लांबी वाढवून त्याची तीव्रता कमी करावी, रस्ता अधिक रुंद करावा, तसेच जेएसबी गिट्टी टाकून पिचिंग करून मजबुतीकरण करावे. अन्यथा कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतो,” असे दोन्ही कार्यकर्त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर सदर पोचमार्ग तात्पुरता असला तरी तो सुरक्षित करण्यात यावा आणि पुलाचे उर्वरित काम पूर्ण करून जडवाहतूक पूर्ववत सुरू करावी अशीही मागणी त्यांनी केली आहे.
स्थानिक नागरिकांनी देखील प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून प्रवास सुरक्षित करावा, असा जोरदार सूर लावला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews #SatiniBridge #KurkhedaNews #RoadSafety #TwoWheelerSafety #InfrastructureAlert #TemporaryRoadHazard #BridgeConstruction #TrafficDisruption #PublicSafety #SteepSlopeRisk #CommunityDemand #LocalNews #RoadImprovement #EmergencyRepair #AccidentPrevention

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here