देसाईगंज वडसा नगर परिषदेत MGNREGA त्वरित सुरू करा

163

– आम आदमी पार्टीची मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनातून मागणी
The गडविश्व
ता. प्र/ देसाईगंज,दि. २३ : गेल्या दहा वर्षांपासून ठप्प असलेली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) देसाईगंज वडसा नगर परिषद क्षेत्रात तात्काळ सुरू करण्याची मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. यासंदर्भात जिल्हा अध्यक्ष नसीर हाशमी यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधीमंडळाने नगर परिषद मुख्याधिकारी सतीश चौधरी यांना निवेदन सादर केले.
पक्षाने आरोप केला की शासन निर्णय असूनही नगर परिषदेत MGNREGA ची अंमलबजावणी होत नसल्याने मजुरांना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागत आहे. शेततळे, विहिरी, पाणदण रस्ते आणि जलस्रोत पुनरुज्जन यांसारखी शेती विकासाची कामे थांबली असून, शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले आहे. शासनाकडून १००% अकुशल मजुरी व ७५% साहित्य खर्चाचा निधी उपलब्ध असतानाही ठोस नियोजन केले गेले नाही, असा आरोप पक्षाने केला.
आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त भागात रोजगार संधी निर्माण करण्यासाठी MGNREGA अत्यावश्यक असल्याचे पक्षाने स्पष्ट केले. नगर परिषदेकडून पात्र कुटुंबांना जॉब कार्ड वितरीत करून किमान १०० दिवसांचा रोजगार हमी दिला जावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच, शेततळे, विहिरी व पाणदण रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देऊन मजुरीचे तात्काळ वितरण, सामाजिक अंकेक्षण व तक्रार निवारण यंत्रणा उभारण्याचीही सूचना पक्षाने केली.
निवेदन सादर करतांना सत्यवान रामटेके, रियाजूल शेख, आशिष घुटके, दीपक नागदेवे, फारुक पटेल, वामन पगाडे व रामदास गोंडाने या प्रसंगी उपस्थिती दर्शवली. १५ दिवसांत ठोस प्रगती अहवाल न मिळाल्यास शेतकरी व मजुरांच्या हक्कांसाठी आंदोलन उभारण्याचा इशाराही आम आदमी पार्टीने दिला आहे.
यामुळे नगर परिषदेच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here