लेखा ग्रामपंचायतीत स्वच्छता पंधरवडा अभियान उत्साहात

71

लेखा ग्रामपंचायतीत स्वच्छता पंधरवडा अभियान उत्साहात
– ग्रामस्थांना दिला “स्वच्छ गाव – निरोगी गाव” चा संदेश
The गडविश्व
ता. प्र /धानोरा, दि. २३ : धानोरा तालुक्यातील लेखा ग्रामपंचायत येथे स्वच्छता पंधरवडा उपक्रमांतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन शासकीय आयटीआय धानोरा, लेखा ग्रामपंचायत आणि हेल्पिंग हँड बहुउद्देशीय संस्था, धानोरा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
या उपक्रमात ग्रामपंचायत परिसर, पोस्ट ऑफिस परिसर तसेच ग्रामपंचायत प्रवेशद्वार स्वच्छ करून गावकऱ्यांना स्वच्छ व निरोगी वातावरण निर्मितीचा संदेश देण्यात आला.
या अभियानात ग्रामविकास अधिकारी ढवळे, सरपंच सौ. नंदा ताई दुगा, हेल्पिंग हँड संस्थेच्या अध्यक्षा सौ. पायल माशाखेत्री, शासकीय आयटीआयच्या निदेशक सौ. बंदरखे मॅडम, देशपांडे, हिंगवे मॅडम, धुराट मॅडम, मोहुर्ले यांच्यासह मान्यवर, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
गावकऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत “स्वच्छ गाव – निरोगी गाव” हा संदेश देण्यात आला. या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, स्वच्छतेबाबत जागरूकता वाढताना दिसून आली.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here