धानोरा येथे भाजपा महिला आघाडीची बैठक संपन्न

110

धानोरा येथे भाजपा महिला आघाडीची बैठक संपन्न
– संघटन बळकटीसाठी आवाहन
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. १४ : भारतीय जनता पार्टी महिला आघाडी तालुका धानोरा तर्फे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या कार्यालयात 13 सप्टेंबर रोजी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत विविध संघटनात्मक कामकाज, स्थानिक प्रश्न, कार्यकर्त्यांच्या अडचणी तसेच आगामी कार्यक्रमांवर सविस्तर चर्चा झाली.
या वेळी जिल्हा अध्यक्ष भाजपा महिला मोर्चा तथा माजी नगराध्यक्ष सौ. योगिता पिपरे यांनी महिला कार्यकर्त्यांना संघटन अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, “ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते गांधी जयंती 2 ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत प्रत्येक कार्यकर्त्याने बूथस्तरावर सक्रिय सहभाग घेऊन महिला आघाडीचे काम गावागावात पोहचवावे.”
बैठकीला प्रमुख उपस्थिती प्रदेश सचिव सौ. रेखा डोळस, जिल्हा महामंत्री सौ. अर्चना बोरकुटे, जिल्हा उपाध्यक्ष सौ. कविता उरकुडे, जिल्हा सचिव सौ. अर्चना चन्नावार यांच्यासह तालुका अध्यक्ष सौ. भुमाला परचाके, सौ. रोशनी बानमारे, सौ. वर्षा कन्नाके, सौ. संजना कोमेटी, सौ. आशा कोमेटी, सौ. ज्योती कोटगले, सौ. माया गुरनुले, सौ. कुसुम चिंचोलकर, सौ. पौर्णिमा गेडाम यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची होती.
या बैठकीतून आगामी सेवा पंधरवड्यासाठी ठोस नियोजन आखण्यात आले असून महिला आघाडीचे काम बूथस्तरावर अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here