उराडीतील माजी पं.स. सदस्याच्या पतीची शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या

86

उराडीतील माजी पं.स. सदस्याच्या पतीची शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा (चेतन गहाणे), दि. १५ : कुरखेडा तालुक्यातील उराडी येथील माजी पंचायत समिती सदस्या कविता कोकोडे यांचे पती चरणदास चेपतू कोकोडे (वय ४७) यांनी दीर्घकाळाच्या आजाराने त्रस्त होऊन राहत्या घरापासून अवघ्या २०० मीटर अंतरावरील शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी १४ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, चरणदास कोकोडे हे गेल्या काही दिवसांपासून दूर्धर आजाराने पीडित होते. सततच्या यातणेला कंटाळून त्यांनी मध्यरात्री ते पहाटे दरम्यान आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सकाळी ते घरात न आढळल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता त्यांचा मृतदेह शेततळ्यात पाण्यावर तरंगताना आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच कुरखेडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृतकाच्या पश्चात पत्नी, आई, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ व मोठा आप्तपरिवार असा परिवार आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolinews #kurkhedanews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here