“सेवा पंधरवडा” अंतर्गत विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले वितरित करा

148

“सेवा पंधरवडा” अंतर्गत विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले वितरित करा
– तहसीलदार गणेश माळी यांचे आवाहन
The गडविश्व
ता. प्र. / धानोरा, दि. १२ : छत्रपती शिवाजी महाराज अभियानांतर्गत राज्यभर १७ सप्टेंबर (पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जन्मदिन) ते २ ऑक्टोबर (महात्मा गांधी जयंती) या कालावधीत “सेवा पंधरवडा” राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून इयत्ता ८वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांना शासनस्तरावरून विविध आवश्यक दाखले पुरविण्यात येणार आहेत.
धानोरा येथे १२ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत तहसीलदार गणेश माळी यांनी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांना आवश्यक दस्तावेज उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना उत्पन्न, जात, अधिवास, नॉन-क्रिमिलेअर इत्यादी दाखले २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत वितरित करण्याचे उद्दिष्ट आहे.
या बैठकीस नायब तहसीलदार (सामान्य) अल्पेश बारापात्रे आणि नायब तहसीलदार (निवासी) देवेंद्र वाळके यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांचे शालेय दस्तावेज तातडीने उपलब्ध करून देण्याची सूचना केली.
बैठकीला तालुक्यातील ३२ शाळांचे मुख्याध्यापक तसेच सेतू केंद्र व्यवस्थापक उपस्थित होते. “सेवा पंधरवडा” उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच आवश्यक दाखले सहज मिळणार असून, भविष्यातील शैक्षणिक व प्रशासकीय गरजांसाठी त्याचा मोठा लाभ होणार आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanoranews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here