गडचिरोलीतील विहिरीतून गरम पाणी निघण्याचे उलगडले गूढ

305

– जि.प. च्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दिला खुलासा
The गडविश्व
गडचिरोली, दि.१२ : अहेरी तालुक्यातील ताटीगुडम ग्रामपंचायत कमलापूर येथे एका खाजगी विहीरीतून गरम पाणी बाहेर येत असल्याची आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली होती. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या तपासणीत ही घटना जमिनीखालील चुनखडकाच्या रासायनिक अभिक्रियेमुळे घडत असल्याचे निष्पन्न झाले आहे.८ सप्टेंबा रोजी सत्यांना मलय्या कटकु यांच्या वीस वर्षे जुन्या विहीरीतून ल गरम पाणी बाहेर येत असल्याची माहिती मिळताच जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने पाहणी केली. या तपासणीत विहीरीच्या पाण्यात पांढरे कण तसेच सबमर्सीबल पंपावर पांढऱ्या थराचे अस्तित्व आढळून आले. भूशास्त्रीय अभ्यासात येथे चुनखडक (कॅल्शियम कार्बोनेट) खडक असल्याचे स्पष्ट झाले.
विहीर, हातपंप आणि इतर विहिरींतील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासले असता गरम पाण्याच्या विहीरीत कॅल्शियम कार्बोनेटची मात्रा तब्बल 923 मि.ग्रॅ./लिटर असल्याचे निष्कर्षात दिसून आले. सहा महिन्यांपूर्वी गाळ काढल्याने पाण्याचा संपर्क जमिनीखालील कॅल्शियम ऑक्साइडशी आला. या खडकाची पाण्यासोबत झालेली उष्माक्षेपी रासायनिक अभिक्रिया (एक्झोथर्मिक रिऍक्शन) मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण करून पाणी गरम झाल्याचे भूशास्त्रीय अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून ही घटना अभ्यासकांसाठीही संशोधनाचा विषय ठरणार आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #Gadchiroli #Tatigudam #HotWater #Well #Limestone #ChemicalReaction #RuralWaterSupply #Geology
#गडचिरोली #ताटीगुडम #गरमपाणी #विहीर #चुनखडक #रासायनिकअभिक्रिया #ग्रामीणपाणीपुरवठा #भूशास्त्र
#hong kong vs bangladesh, mirai, हाँग काँग बनाम बांगलादेश, nano banana ai 3d figurines, demon slayer infinity castle, saiyaara, infosys share buyback, tanzim hasan sakib

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here