मुनघाटे महाविद्यालयात राज्यस्तरीय क्षमता विकास कार्यशाळा संपन्न
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०७ : श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली संचालित श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राज्यस्तरीय क्षमता विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियाना अंतर्गत गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली व मुनघाटे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा पार पडली.
कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेचे आराध्यदैवत श्री साई यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व गोंडवाना विद्यापीठ गीताने झाले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय थुल होते. प्रमुख वक्ते प्राचार्य डॉ. प्रशांत जाकी (शासकीय विज्ञान महाविद्यालय, गडचिरोली) व प्रा. मानतेश तोंडरे (वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख) यांनी ‘ॲकेडेमिक बॅंक ऑफ क्रेडिट’, ‘रिसर्च मेथडॉलॉजी’ व ‘आयपीआर’ या विषयांवर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
शिक्षण, संशोधन आणि बौद्धिक संपदा संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत मान्यवरांनी विद्यार्थ्यांना आवश्यक माहिती दिली. कार्यशाळेचे प्रास्ताविक व संचालन डॉ. डी. बी. झाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. सचिन धवनकर यांनी केले.
या वेळी डॉ. किरमीरे, डॉ. जम्बेवार, डॉ. वाघ, डॉ. चव्हाण, डॉ. गोहणे, डॉ. पुण्यप्रेड्डीवार, प्रा. बनसोड, डॉ. पठाडे, प्रा. वाळके, प्रा. खोब्रागडे मॅडम, डॉ. भुरसे, प्रा. धाकळे, प्रा. करमनकर तसेच मनोज नंन्नावरे, राकेश बोंगीरवार यांच्यासह प्रशासकीय कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यशाळेची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














