रांगीत शेतशिवार फेरीतून पांदण रस्त्यांची पाहणी
The गडविश्व
ता. प्र /धानोरा, दि. ०७ :धानोरा तालुक्यातील रांगी ग्रामपंचायतीच्या वतीने शेतकऱ्यांच्या शेतशिवारात जाणाऱ्या पांदण रस्त्यांची पाहणी करण्यासाठी ५ सप्टेंबर रोजी शेतशिवार फेरी काढण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान अभियानांतर्गत ‘शेत पांदण रस्ते पाहणी’ तसेच ‘सर्वांसाठी घरे २०२२’ या योजनेअंतर्गत महसूल विभागाच्या जमिनीवर बांधण्यात आलेल्या घरांच्या अतिक्रमणाची पाहणीही यावेळी करण्यात आली.
या शिवार फेरीत ग्रामपंचायत सरपंच फालेश्वरी गेडाम, उपसरपंच नुरज हलामी, सदस्य राकेश कोराम, सदस्या शशिकला मडावी, तंटामुक्ती समिती अध्यक्ष तुळशिराम भुरसे, ग्राम महसूल अधिकारी प्रसाद मडावी, महसूल सहाय्यक यशपाल टेंभुर्णे, ग्रामपंचायत अधिकारी मकरंद बांबोळे, कर्मचारी नामदेव बैस, दीपक कुकुदकर, नितेश गेडाम, मोबिलायझर सौ. लीला कन्नाके यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उमाजी चापले, बाम्बोडे जी, देवराव कुन्घादकर यांच्यासह अनेकांनी सहभाग नोंदवला.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














