266 रुपयांच्या पोत्याला 500 आकारणी ; शेतकऱ्यांच्या आक्रोशानंतर आमदार नरोटेंची धडक कारवाई

396

The गडविश्व
ता.प्र/ धानोरा, दि. ०१ : धानोरा तालुक्यात युरिया खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पिराणी कृषी केंद्राने 266 रुपयांच्या पोत्याला तब्बल 500 रुपये आकारून शेतकऱ्यांची लुबाडणूक केली. या लुटीविरोधात संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन छेडत प्रशासनाचा जाब विचारला.
दरम्यान, प्रकरणाची माहिती मिळताच गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे धानोरा येथे धडकले. त्यांनी थेट कृषी केंद्र संचालकांना धारेवर धरत शेतकऱ्यांची लूट थांबवली. तालुका कृषी अधिकारी पवन मडावी यांच्या उपस्थितीत गोडाऊनची पाहणी करून आमदारांनी स्पष्ट आदेश दिले की, उर्वरित युरिया खत सरकारी दरानेच (266 रुपये) विकले जावे. तसेच ज्या शेतकऱ्यांकडून जादा पैसे घेतले, त्यांना तातडीने परत करावेत.
कृषी केंद्राने खत संपल्याचे सांगत काही शेतकऱ्यांना मात्र रिकाम्या हाताने घरी जावे लागले, यामुळे शेतकरीवर्गात मोठा संताप पसरला आहे. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांचा आक्रोश आणि आमदारांचा थेट हस्तक्षेप यामुळे धानोऱ्यातील खत माफियांचा पर्दाफाश झाला असून, या प्रकरणात संबंधित कृषी केंद्रावर कठोर कारवाई करण्याची मागणी तीव्र होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here