“अपघात झाल्यास जबाबदार कोण?” नागरिकांचा वनविभागाला सवाल

872

– झाडाला दिलेला टेकू जीवघेणा ठरू शकतो, नागरिकांचा इशारा
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०१ : तालुक्यातील गोडलवाही–मिचगाव मार्गावर उभ्या सागाच्या झाडामुळे अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी जोरदार वाऱ्यामुळे हे झाड विद्युत खांबावर कोसळले होते. त्यावेळी वीज वाहिन्या तुटून परिसरातील वीजपुरवठा दोन दिवस खंडित राहिला होता. दुरुस्तीच्या वेळी हे झाड तोडताना त्याला एका काठीचा आधार देऊन रस्त्यावरच उभे केले. मात्र झाड बुंध्यापासून पूर्ण कापले गेले नाही आणि आधारासाठी दिलेली काठीही न काढल्यामुळे हे झाड प्रवाशांच्या जीवावर बेतणारा सापळा ठरले आहे.
दररोज या रस्त्यावरून शेतकरी, प्रवासी, शालेय विद्यार्थी व वाहनधारकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते. झाड अचानक कोसळल्यास गंभीर अपघात होऊ शकतो, अशी भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. “एखाद्या नागरिकाचा जीव गेला तर जबाबदार कोण?” असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
वनविभागाकडून वेळेत दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, तातडीने झाड हटवून रस्ता सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here