The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २१ : तालुक्यातील मुरूमगाव परिसरात शेतकऱ्यांना युरिया खताचा गंभीर तुटवडा भासू लागला आहे. सध्या रोवणी सुरू असताना आणि पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसत असताना युरियाची गरज तीव्र आहे. मात्र कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांना खत उपलब्ध होत नसल्याने त्यांना उगाचच भटकावे लागत आहे.
मुरूमगाव छत्तीसगडच्या सीमेवर असल्याने युरियाचा पुरवठा छत्तीसगडमार्गे होत असल्याची चर्चा असून, अलीकडेच खताने भरलेली एक गाडी पकडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे खत गेला तरी कुठे? असा संतप्त प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.
काही कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आधारवर युरिया घेण्यात आल्याचीही शंका व्यक्त केली जात आहे. “शेतकऱ्यांचे रोप अजूनही बाकी आहेत, तर काहींच्या धानावर रोगांचा प्रादुर्भाव आहे. खताशिवाय पिकांचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे कृषी विभागाने तातडीने चौकशी करून योग्य तो पुरवठा करावा,” अशी मागणी शेतकरी नेते गौतम राणा, संजू उईके, प्रभाकर हलामी, जयराम संगोडिया, राजकुमार जांभळा, नरेंद्र देहारी, शत्रुघ्न संगोडिया, प्रकाश पोया व सुखमसिंग पदा यांनी केली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanoranews












