The गडविश्व
गडचिरोली, दि. २५ : कारगील विजय दिनानिमित्त उद्या २६ जुलै रोजी गडचिरोली शहरात देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीर जवानांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करून गौरव करण्यात येणार आहे. कारगील चौक येथे सकाळी ९:४० वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
गेल्या २५ वर्षांपासून कारगील दुर्गा उत्सव मंडळ, गडचिरोली यांच्या वतीने सातत्याने या दिवशी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यंदाही उत्साहात आणि राष्ट्रप्रेमाने भारलेला हा सोहळा संपन्न होणार आहे. कारगील युद्धातील शहीद वीरांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या बलिदानाला मानवंदना दिली जाणार आहे.
या कार्यक्रमासाठी गडचिरोलीतील सर्व देशभक्त नागरिक, विद्यार्थी, युवक व महिला यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते यांनी केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #कारगीलविजयदिवस #गडचिरोली #देशभक्ती #श्रद्धांजली #KargilVijayDiwas













