The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि. ०२ : आदिवासी हलबा/हलबी समाज कर्मचारी महासंघ, नागपूर अंतर्गत जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने मुरूमगाव (ता. धानोरा) येथे 31 मे रोजी भव्य कॅडर कॅम्पचे आयोजन करण्यात आले. समाजातील शिक्षणवाढ, मार्गदर्शन आणि सक्षमीकरणाच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या या उपक्रमास विद्यार्थ्यांसह पालक आणि गावकऱ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मनीराम रावटे (जिल्हाध्यक्ष, समाज संघटना, गडचिरोली) होते. उद्घाटन माधव गावड (केंद्रीय कार्याध्यक्ष, महासंघ, नागपूर) यांच्या हस्ते संपन्न झाले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राचार्य कपूर नाईक (नेवजाबाई हितकारीणी, ब्रह्मपुरी – अध्यक्ष, महासंघ चंद्रपूर), प्रा. केशव घरत (सचिव, महासंघ चंद्रपूर) आणि प्रा. नेताजी गावड (शासकीय आश्रमशाळा, रांगी) यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात इयत्ता ५वी व ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षांचे मार्गदर्शन, तसेच इयत्ता १०वी व १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर व स्पर्धा परीक्षांवर सखोल माहिती दिली गेली. याशिवाय, समाजातील अनेक विद्यार्थ्यांना जात व वैधता प्रमाणपत्र काढताना येणाऱ्या अडचणींसंदर्भात उपाय आणि मार्गदर्शन देण्यात आले.
विशेष आकर्षण ठरले ते १०वी व १२वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान. या विद्यार्थ्यांना डायरी व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात लोकचंद बालापुरे (जिल्हाध्यक्ष, महासंघ गडचिरोली), सरादू चिराम (सचिव), जयलाल मार्गिया, कचरू पटेल, महारसंग फरदिया, श्रीराम राऊत, बैसाकू कोटपरिया, वसंजी कोलियारा, रामलाल मार्गिया यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरादू चिराम यांनी केले, तर सुत्रसंचालन दयाराम कवलीया यांनी, आणि आभारप्रदर्शन सोनसिंग धनगुण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये येलसिंग मलिया, ड्रापसिंग चिराम, लवकेश कोरटिया, गौतम राणा, राजू कोठवार, नेघूराम कोठवार, धनराज ओडमडिया यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या समारोपाला चहा व अल्पोपहाराने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. एकूणच, हा कॅडर कॅम्प हलबा/हलबी समाजाच्या एकतेचे, प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या सामूहिक प्रयत्नांचे उत्तम उदाहरण ठरला.
