– सचिवपदी विजय नाकाडे, कार्याध्यक्षपदी विनोद नागपुरकर
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. ७ : गडचिरोली जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुडमवार यांच्या सुचनेनुसार आणि जिल्हा कार्याध्यक्ष नसीर हाशमी यांच्या उपस्थितीत व्हॉइस ऑफ मीडिया कुरखेडा तालुका कार्यकारिणीची गठित करण्यात आली. यामध्ये तालुका अध्यक्षपदी विजय भैसारे, सचिवपदी विजय नाकाडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
गडचिरोली जिल्ह्यात १२ तालुक्यांसाठी नवीन कार्यकारिणीचे गठन
व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, प्रदेश कार्याध्यक्ष मंगेश खाटीक आणि विदर्भ अध्यक्ष किशोर कारंजेकर यांच्या आदेशानुसार गडचिरोली जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांसाठी नवीन कार्यकारिणी गठीत करण्याचे काम सुरू आहे. जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुडमवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबवली जात आहे.
नवनियुक्त तालुका अध्यक्ष विजय भैसारे आणि सचिव विजय नाकाडे यांनी आपल्या सहकारी कार्यकारिणीची निवड बैठकीतच केली. त्यामध्ये तालुका कार्याध्यक्ष विनोद नागपुरकर, कोषाध्यक्ष शिवा भोयर, कार्यवाहक महेंद्र लाडे, प्रसिद्धी प्रमुख सिराज पठाण, मार्गदर्शक व जिल्हा कार्यकारिणी सदस्य ज्येष्ठ पत्रकार रमेश बोरकर व ताहीर शेख,
सदस्यपदी श्याम लांजेवर, शालिकराम जनबंधू, राम लांजेवार, चेतन गहाणे इत्यादीची निवड करण्यात आली आहे.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जिल्हा कार्याध्यक्ष नासिर हाशमी आणि उपस्थित पत्रकारांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. पत्रकारांच्या समस्या, येणाऱ्या अडचणी आणि पत्रकार भवन उभारणीसाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही नवनियुक्त अध्यक्ष व सचिवांनी दिली.
