धक्कादायक : गडचिरोलीत शाळेतील विद्यार्थिनींशी अश्लील चाळे, मुख्याध्यापकास घातल्या बेड्या

2740

– भामरागड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील घटना
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०६ : जिल्ह्यात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. भामरागड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मागील काही दिवसांपासून शाळेच्या मुख्याध्यापकांकडूनच शाळेतील अल्पवयीन बालिकांसोबत अश्लील कृत्य केले जात होते, पीडित विद्यार्थिनींनी पालकांना आपबिती सांगितली असता हि धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्याध्यापकास बेड्या घातल्या आहेत. रविंद्र उष्टुजी गव्हारे (वय ४५), रा. ता. भामरागड, जि. गडचिरोली असे अश्लील चाळे करणाऱ्या मुख्याध्यापकाचे नाव आहे.
मिलालेल्या माहितीनुसार, भामरागड तालुक्यातील कुक्कामेट्टा येथील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापकांकडूनच शाळेतील अल्पवयीन बालिकांसोबत अश्लील कृत्य केले जात होते. एकाच कुटुंबांतील दोन पीडित बालिका शाळेत जाण्याची तयारी करत असताना शाळेत जाण्यासाठी नकार देत होत्या व शाळेत जाण्यासाठी घाबरत होत्या. हा प्रकार पालकांच्या लक्षात आल्याने पालकांनी सदर अल्पवयीन बालिकांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता बालिकांनी शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र उष्टुजी गव्हारे हे त्यांना वेगवेगळया वेळी शाळेतील ऑफिसमध्ये रजिस्टर घेऊन येण्याच्या बहाण्याने बोलावून इतर कोणीही नसताना त्यांच्यासोबत अश्लील कृत्य करत असतात व या प्रकाराबाबत कोणाला सांगितले तर मारण्याची व शाळेतून काढण्याची धमकी देत असतात असे सांगितले. पालकांनी गांभीर्य लक्षात घेऊन त्याच शाळेमध्ये शिकणा­या इतर बालिकांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांसमक्ष बालिकांकडे चौकशी केली असता, मुख्याध्यापक रविंद्र गव्हारे यांनी काही इतर मुलींसोबत देखील या प्रकारचे अश्लील कृत्य केले असल्याचे बालिकांनी सांगितले.
सदर प्रकार उघडकीस आल्यानंतर पालकांनी उपविभाग भामरागड अंतर्गत येणा­या उप-पोस्टे लाहेरी येथे गाठून ०५ मार्च २०२५ रोजी तोंडी तक्रार केली असता पोलीसांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुक्कामेट्टाचे मुख्याध्यापक रविंद्र उष्टुजी गव्हारे विरूध्द कलम 74, 75(2), 351(2)(3) भा.न्या.सं., सहकलम 8, 10, 12, पोक्सो अधि., सहकलम 3 (1) (डब्लु) (i) (ii), 3 (2) (Va) अनु. जाती. जमाती कायदा अन्वये गुन्हा नोंद करून भामरागड पोलीसांनी अटक केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते, उपपोस्टे लाहेरी व पोस्टे भामरागड येथील अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी आश्वासन दिले आहे की, सदर प्रकारच्या गंभीर गुन्ह्रांमध्ये आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करुन आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा मिळावी यासाठी गडचिरोली पोलीस दल प्रयत्नशील राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here