दारू व तंबाखूमुक्त शाळा निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सादर केले प्रकल्प

235

तालुकास्तरीय स्पर्धेत गडचिरोलीतील १२ शाळांचा सहभाग
The गडविश्व
गडचिरोली, २६ फेब्रुवारी : मुक्तिपथ व शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत गडचिरोली तालुक्यातील १२ शाळा सहभागी झाल्या होत्या. या विद्यार्थ्यांनी दारू व तंबाखूमुक्त शाळा निर्माण करण्यासाठी प्रकल्प सादर करून परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
या कार्यक्रमाचे उदघाटन विस्तार अधिकारी राऊत यांनी केले. परीक्षक म्हणून सचिन फुलझले, उपेंद्र रोहणकर, मनोहर हेपट यांनी काम बघितले. यावेळी मुक्तिपथचे उपसंचालक संतोष सावळकर, केंद्रप्रमुख ताराम, मेश्राम, तालुका संघटक अमोल वाकुडकर, उपसंघटक रेवनाथ मेश्राम, स्वीटी आकरे उपस्थित होते.
दारू व तंबाखूमुक्त शाळा निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने शाळेत प्रश्नमंजुषा स्पर्धा कार्यक्रम घेण्यात आला. शाळेतून प्राविण्य गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांची स्पर्धा केंद्र स्तरावर घेण्यात आली. प्रत्येक केंद्रातून २ शाळांची निवड तालुका स्तरावर करण्यात आली. तालुका स्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा विचार कार्यक्रमात एकूण १२ शाळांनी सहभाग घेतला होता. यामध्ये जिप शाळा बेलगाव, आंबेटोला, आंबेशिवनी, धुंडेशिवणी, काटली, जिप शाळा मेंढा, शिवणी, मारकबोडी, मुडझा, चांदाळा, शासकीय आश्रमशाळा पोटेगाव, गोगाव या शाळांचा समावेश आहे. या शाळांतील विद्यार्थ्यांनी दारू व तंबाखूमुक्त शाळा, शाळेच्या परिसरातील दारू व तंबाखूविक्री बंद करणे यावर उत्तम अशे सादरीकरण केले. यामध्ये प्रथम क्रमांक शिवणी येथील जिप उच्च प्राथमिक शाळेने पटकाविला. द्वितीय क्रमांक काटली शाळेने मिळविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here