The गडविश्व
गडचिरोली, १५ ऑगस्ट : विदर्भ इंटरनॅशनल स्कूल अँड पोद्दार जंबो किड्स मध्ये ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी शाळेचे संस्थापक ऍड. संदीप धाईत उपस्थित होते. याप्रसंगी संदीप धाईत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण झाल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांकरिता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीत, नृत्य यासोबतच नाट्य दृश्य तसेच विविध वक्तव्य यांचे सादरीकरण केले. तसेच मान्यवरांचे भाषण झाले यात संदीप धाईत यांनी स्वातंत्र्याचा मान राखला जाईल असे आपले वागणे असावे असे सांगितले तसेच प्राचार्या मंदारे मॅडम यांनी स्वातंत्र्याचा आपले जीवन सुधारणेसाठी उपयोग करून घ्यावा असे मत व्यक्त केले.
माध्यमिक स्तरातील विद्यार्थ्यांनी सादर केलेली शहीद जवानांच्या जीवनावर आधारित नाटिका हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते. तसेच विविध स्वातंत्र्य सेनानी यांची वेशभूषा धारण करून त्यांचे संदेश विद्यार्थ्यांनी सादर केले.
सदर कार्यक्रमात नॅशनल ओलंपियाड स्पर्धेत गोल्ड मेडल प्राप्त केलेल्या वेदांत वरतकर, कु. मधुरा कावळे आणि कु. भार्गवी कावळे यांचा गौरव करण्यात करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका कु.नेहारिका मंदारे यांना All India Olmpiad Association मार्फत Best Principal अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले.
दरम्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका कु.नेहारिका मंदारे मॅडम तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थापक ऍड. संदीप धाईत आणि प्रशासकीय अधिकारी प्रिती मुंढे मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख कु. प्रशांती वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिभा कावळे, ऋतिका मामिडवार, मेघा रोडे, श्रुती संगोजी, शुभम भोयर, मोनाली नागपुरे, प्रिती चीचघरे, सायली पायल, प्रणय मेडपल्लिवार, आचल धोटे, स्नेहल रायपूरे, विवेक सोनवणे, शुमालिया पठाण, वैष्णवी येवले, करिश्मा ओळख, सूरज डोईजड, धर्मेंद्र वंजारी, मनीषा गरादे, नुरसब्बा सय्यद, अलका मिसार, रुपाली ठाकरे, सुहासिनी रॉय, सपना राऊत, सनी मोहुर्ले, मेघा कोडापे, स्नेहल मेश्राम , सुजाता उंदिरवाडे , पल्लवी रायपूरे, राजश्री सुर्यवंशी, हिमानी उपाध्याय , सुप्रिया कुंभमवार यांनी परिश्रम घेतले. तसेच शिक्षकेतर कर्मचारी प्रेमकुमार मांझी, सुप्रिया गायकवाड, साकेत शर्मा यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे संचालन वर्ग ८ ची विद्यार्थिनी खुशिकुमारी उपाध्याय, लतिका यादव यांनी केले तर आभार वर्ग ६ वी चा विद्यार्थी सर्वेश भेंडरे याने मानले.