५५ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त ; दोन विक्रेत्यांवर कारवाई

50

The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : गडचिरोली पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने वेगवेगळ्या ठिकाणी संयुक्त कारवाई करीत देशी-विदेशी दारूसह ५५ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोन दारूविक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हजरत शेख, अनिल नेहरू हीचामी रा. झुरी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन दारूविक्रेत्यांचे नाव आहेत.
गडचिरोली शहरातील कट्टानी नदीच्या बाजूला असलेल्या पानठेल्यावर अवैध दारु विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली त्याआधारे धाड टाकली असता अंदाजे ४ हजार ४५० रुपये किंमतीची ६५ देशी टिल्लू जप्त करण्यात आले. याप्रकरणी आरोपी हजरत शेख याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला. लगेच मुरखडा-मुडझा मार्गावरून दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने सापळा रचून एटापल्ली तालुक्यातील झूरी येथील अनिल नेहरू हीचामी या दारू तस्कराकडून २४ बियर अंदाजे किंमत ७ हजार २०० रुपये व ४४ हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण ५१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही कार्यवाहीत ५५ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवई गडचिरोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रेवचंद शिंगणजुडे यांच्या मार्गदर्शनात डी.बी.पथकातील धनंजय चौधरी, पोलिस कर्मचारी अविनाश लांजे, पोलिस कर्मचारी तुषार खोब्रागडे, राजेंद्र पुरी, महिला पोलिस ऋषाली चव्हाण, मुक्तीपथचे मंगेश रामटेके, रेवनाथ मेश्राम, मेघा गोवर्धन यांनी केली.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #muktipath )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here