सीबीआयची एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे अधिकारी ताब्यात

387

– सीबीआयची दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई
The गडविश्व
नागपूर : एक लाख रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अण्वेषण विभागाने (सीबीआय) एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत गुन्हे दाखल करून इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे (आयओसीएल)च्या तीन अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.
नागपूर आणि गोंदियात सीबीआयने काल शुक्रवारी केलेल्या या कारवाईमुळे आयओसीएल वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील खाडीपार, गोरेगाव येथील मिरा पेट्रोल पंपाच्या मालकाला पंपावर आवश्यक साठा उपलब्ध करून देण्यासाठी दुसरीही अशीच एक आयओसीएलचे विक्री अधिकारी सुनील गोलार यांनी एक लाखाची लाच मागितली. पंप संचालकांनी सीबीआयचे वरिष्ठ अधीषक सलीम खान यांच्याकडे तक्रार नोंदवली. तक्रारीची शहानिशा सुरू असतानाच दुसरीही अशीच एक तक्रार आकाश अशोक चौधरी (गोरेगाव, गोंदिया) यांच्याकडून सीबीआयला मिळाली. या दोन्ही तक्रारी खऱ्या असल्याची खात्री करून घेतल्यानंतर अधीषक सलिम खान यांनी गुरुवारी रात्री या प्रकरणात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले. त्यानंतर दोन वेगवेगळी पथके तयार करून एका पथकाने गोंदियात गोलारविरुद्ध तर दुसऱ्या पथकाने नागपुरात कारवाई करून आयओसीएलचे महाव्यवस्थापक एन. पी. रोडगे आणि मुख्य व्यवस्थापक मनीष नंदले (किरकोळ विक्री) या दोघांना एक लाखाची लाच घेताना सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. गोंदियात गोलरच्या मुसक्या बांधल्यानंतर सीबीआयच्या पथकाने त्याच वेळी नंदले आणि रोडगेला नागपुरात जेरबंद केले. यानंतर या तिघांच्याही निवास आणि कार्यालयात सीबीआयच्या वेगवेगळ्या चमू झाडाझडती घेऊ लागल्या. रात्रीपर्यंत ही चौकशी सुरू होती. शनिवारी या तीनही लाचखोर अधिकाऱ्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर केले जाईल, अशी माहीती अधीषल सलीम खान यांनी लोकमतला दिली. अशा प्रकारे लाचेसाठी कुणी काम अडवून धरत असेल आणि कोंडी करत असेल तर अशा लाचखोरांची तक्रार ०७१२-२५१०३८२ किंवा ९४२३६८३२११ या क्रमांकावर करावी, असे आवाहनही सीबीआयने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here