शेतकऱ्याचा नादखुळा : एका एकर जागेत बांधली तब्बल २०० फूट रुंद महाकाय विहीर

516

The गडविश्व
बीड : ते म्हणतात न शेतकऱ्याचा नाद करू नये. असेच काही राज्यातील एका शेतकऱ्याने पराक्रम केला आहे. शेतकऱ्याने आपल्या एका एकर शेतात तब्बल २०० फूट रुंद व ४१ फूट खोल महाकाय विहीर बांधली आहे. या विहिरीला २ कोटी एवढा खर्च आल्याचे बोलल्या जात आहे.
बीडमधील गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी गावातले मारुती बाजगुडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची एक एकर जमीन रोड बनवणाऱ्या IRB कंपनीने गौण खनिज खोदकामासाठी घेतली. इथला मुरूम आणि खडक रस्त्याच्या कामात वापरण्यात आला. त्यापोटी बाजगुडेंना लाखो रुपयांचा मोबदलाही मिळाला.
रस्त्याचे काम झाल्यानंतर बाजगुडेंच्या शेतात मोठी खदान तयार झाली. बाजगुडे यांनी शक्कल लढवली आणि या खदानीला सगळ्या बाजूंनी कठडा बांधून घेतला. तब्बल दोन कोटी रुपये खर्चून तयारी झाली 202 फूट रूंद आणि 41 फूट खोल विहीर. त्यात कधी नव्हे तो यंदाच्या वर्षी चांगला पाऊस पडला. आणि ही एक एकरातली विहीर पाण्याने तुडुंब भरली.
सरकारी काम आणि सहा महिने थांब, अशी परिस्थिती असते. सरकारी कामासाठी संपादीत केलेल्या जमिनींचा मोबदला अनेकांना वर्षानुवर्षे मिळत नाही. पण मारूतीरावांनी मोबदला तर पदरात पाडून घेतलाच. शिवाय मोकळ्या खदानीचे रुपांतर महाकाय विहिरीत केले हे विशेष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here