राज्यसरकार भोंग्याबाबत निर्णय घेऊ शकत नाही : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

229

– सर्वपक्षीय नेत्यांची बैठकीनंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची माहिती
The गडविश्व
मुबंई : राज्यातील मशिदींवरील भोंग 3 मे 2022 पर्यंत काढले गेले नाहीत तर मनसे आक्रमक भूमिका घेईल, असा इशारा देण्यात आला आहे.त्याबाबत महाविकास आघाडी सरकारने आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. यावेळी भोंग्याबाबत राज्य सराकार भूमिका घेऊ शकत नाही. केंद्र सरकारने याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.
राज्याच्या राजकारणामध्ये सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय असणाऱ्या मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात आज गृह खात्याने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी बैठकीतील चर्चेबद्दलची माहिती दिली. या बैठकीला इशारा देणारे राज ठाकरे यांनी दांडी मारली. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दांडी मारली. तसेच इम्तियाज जलील, प्रकाश आंबेडकर यांनीही दांडी मारली. केवळ मनसेचे काही नेते उपस्थित होते.
शासन आदेशानुसार भोंग्यांचा वापर कायम राहणार आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाने 2005 साली आदेश काढल्याने हा आदेश केंद्र सरकारच्या माध्यमातून देशभरात लागू झाल्यास वेगवेगळ्या राज्यांमधील वेगवेगळी भूमिका संपुष्टात येईल, असे सांगतानाच राज्य सरकार यासंदर्भात काहीही निर्णय घेणार नाही, असे ते म्हणाले. सध्या ज्या शासन आदेशानुसार भोंगे वापरले जातात हे कायम राहणार आहे, असेही गृहमंत्री म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here