रस्त्यावर भले मोठे भगदाड पडल्याने जीवघेणा प्रवास

179

– पावसाने मार्ग होतो बंद

The गडविश्व
गडचिरोली, २७ जुलै : जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून अनके मार्गाची दुरावस्थाही झाली आहे. जिल्ह्या मुख्यालयाशी जुळून असलेल्या खरपुंडी मार्गावर रस्त्यावर भले मोठे भगदाड पडल्याने नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचे वास्तव चित्र आहे.
गडचिरोली पासून वनविभागाच्या नाका नंतर खरपुंडी कडे जाणाऱ्या रस्त्यावर कमी उंचीचा पूल असून मुसळधार पावसाने त्या पुलावरून पाणी वाहत असते . तसेच पावसाच्या पाण्यामुळे भले मोठे भगदाड पडल्याने त्यात पाणी भरून असल्याने खड्याचा अंदाज लक्षात येत नाही व त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याचे नाकारता येत नाही. मुसळधार पावसाने सदर मार्ग बंद होत असल्याने मुख्यालयी येणाऱ्या नागरिकांना माडेतुकुम मार्गे अधिक अंतर पार करून प्रवास करावा लागत आहे. खरपुंडी मार्गे दिभना, राजगटा माल, जेप्रा , राजगटा चेक, कळमटोला, अमिर्झा येथील नागरीकाकांचे अवागमन असते मात्र अशा परिस्थतीत माडेतुकूम मार्गे जिल्हा मुख्यालय गाठावे लागत आहे. या मार्गाची संबंधित विभागाने दखल घेऊन दुरुती करावी अशी मागणी नागिरकांतून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here