The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २० ऑगस्ट : स्थानिक श्री जी सी पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात रा. से यो. विभाग तथा तालुका न्यायालय व पोलीस स्टेशन धानोरा यांच्या संयुक्त विद्यमाने “कॉमन मिनिमम प्रोग्राम” च्या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध विषयावर कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून धानोराचे दिवाणी व फौजदारी न्यायाधीश आर. खामतकर, धानोराचे पोलीस निरीक्षक सुधाकर देठे, ऍड. राहुल गावडे, ऍड. दुगा, पोलीस उपनिरीक्षक भिसे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. पंकज चव्हाण हे होते तर न्यायाधीश खामतकर यांनी ” नालसा स्कीम २०१५ ऍसिड अटॅक, ट्राफिक रूल इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले तर पोलीस निरीक्षक सुधाकर देठे यांनी वाहतूक नियम यावर मार्गदर्शन केले. तसेच ऍड. गावडे यांनी पोक्सा ॲक्ट यावर विस्तृत मार्गदर्शन केले
कार्यक्रमाचे संचालन रा.से.यो. प्रमुख प्राध्यापक ज्ञानेश बनसोड यांनी केले तर आभार प्राध्यापक पी पठाडे यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, तथा न्यायालयीन कर्मचारी धानोरा, रा.से.यो.स्वयंसेवक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कायदेविषयक शिबिराची सांगता राष्ट्र गायनाने करण्यात आली.
