प्रचार रॅली आणि सार्वजनिक सभांवर असलेली बंदी निवडणूक आयोगाने पुन्हा वाढवली

103

– ३१ जानेवारी पर्यंत असणारा बंदी
The गडविश्व
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज निवडणूक प्रचारांच्या रॅली आणि सार्वजनिक सभांवर असलेली बंदी आणखी वाढवण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने रॅली आणि सार्वजनिक सभांवरील बंदी 22 जानेवारीपर्यंत वाढवली होती. आता देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता निवडणूक आयोगाने ही बंदी 31 जानेवारीपर्यंत कायम ठेवली आहे. नुकतीच कोरोना महामारी आणि ओमायक्रॉन संकटामध्ये उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे.
कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने निर्बंध लागू केले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा कालावधी एक तासाने वाढण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. तसेच प्रचारादरम्यान कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. सुरुवातीला आयोगाने 15 जानेवारीपर्यंत रॅली, सभा, रोड शो, साईकल आणि बाईक रॅलीवर निवडणूक आयोगाने बंदी घातली. नंतर 22 जानेवारी आणि आता 31 जानेवारीपर्यंत वाढवली आहे. त्यानंतर कोरोनाची परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असे देखील म्हटले आहे.
निवडणूक आयोगाने सर्व पक्ष आणि उमेदवारांना डोअर टू डोअर प्रचारासाठी परवानगी दिली आहे. तसेच व्हर्च्युअल माध्यमातून उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. काही पक्षांनी तर याची सुरुवात देखील केली आहे. परंतु उत्तरप्रदेशसारख्या राज्यात विना रॅली निवडणुकांचा प्रचार कसा होणार यासाठी काही पक्ष चिंतेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here