पोलीस-नक्षल चकमकीत ५ लाख रुपयांचे बक्षीस असलेला नक्षली अर्जुन उर्फ ​​लखमा सोडी ठार

893

– स्फोटक साहित्यांसह नक्षली साहित्य जप्त
The गडविश्व
दंतेवाडा : येथील अरणपूर पोलीस स्टेशन हद्दीतीतलं बुरगुम जंगल परिसरात DRG फोर्स आणि नक्षल्यांमध्ये काल १९ फेब्रुवारी रोजी चकमक उडाली . या चकमकीत एक नक्षली ठार झाला असून घटनास्थळावरून स्फोटक साहित्य, शस्त्र व अनेक नक्षली साहित्य जप्त करण्यात आले आहे. मलंगर एरिया कमिटी सदस्य/एरिया मिलिशिया कमांड इनचार्ज अर्जुन उर्फ ​​लखमा सोडी (३४ ) रा. बुर्गम असे ठार झालेल्या नक्षलीचे नाव आहे. त्याच्यावर शासनातर्फे ५ लाख रुपयांचे बक्षीस होते. त्याच्यावर अरणपूर पोलीस ठाण्यात एकूण 13 गुन्हे दाखल आहेत. दंतेवाड़ाचे पोलीस अधिक्षक सिद्धार्थ तिवारी यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
काल १९ फेब्रुवारी रोजी अरणपूर पोलीस स्टेशन हद्दीतीतलं बुरगुम जंगल परिसरात मलंगर एरिया कमिटी सदस्य/एरिया मिलिशिया कमांड इन्चार्ज अर्जुन उर्फ ​​लखमा सोडी यांच्यासह मोठ्या संख्येने नक्षली जमा झाल्याच्या गोपनीय माहितीवरून DRG फोर्स नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना आधीच जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी जवानांच्या दिशेने अंधाधुंद गोळीबार केला .जवानांनीही प्रत्युत्तर देत नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला. काही काळ चकमक सुरु असताना नक्षली जंगलाच्या दिशेने पसार झाले. चकमकीनंतर घटनास्थळाची झडती घेतली असता एका नक्षलींचा मृतदेह आढळून आला
मलंगर एरिया कमिटी सदस्य/एरिया मिलिशिया कमांड इनचार्ज अर्जुन उर्फ ​​लखमा सोढी वडील नंदा सोढी (३४ ) रा. बुर्गम, ठाणे अरणपूर असे त्याचे नाव आहे. मृतदेहाजवळ एक पिस्तूल, काळ्या रंगाचे होल्स्टर आणि रिकामे कवच सापडले. दुसरीकडे घटनास्थळाची झडती घेतली असता काळ्या रंगाचा नक्षली गणवेश, सुमारे पाच किलो वजनाचा टिफीन बॉम्ब, इलेक्ट्रॉनिक वायर, वायर कटर, टिफीन बॉम्बचे स्विच बटण, नक्षलवादी साहित्य व दैनंदिन उपयोगी साहित्य जप्त करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here