धानोरा : लेखा नजीकच्या राधेश्याम बाबा मंदिरा जवळ खड्ड्यांमुळे अपघात, २ युवक जखमी

393

The गडविश्व
ता.प्र. / धानोरा, २ सप्टेंबर : गडचिरोली- धानोरा हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने या राष्ट्रीय महामार्गावर अनेक लहान मोठे खड्डे आहेत. असेच खड्डे लेखा गावाजवळील राधेश्याम बाबा मंदिरा नजीकच्या कठाणी नदीच्या बाजूला खोल खड्डे पडलेले असून एका बाजूने दोन वर्षा पूर्वी बांधलेली संरक्षण भिंतच वाहून गेलेली आहे त्यामुळे मोठे खड्डे पडलेले आहे. या खड्ड्यामुळे ये-जा करण्याऱ्या नागरिकांना नाहक त्रास होत असून याच खड्ड्यामुळे अपघात होऊन दोघेजण युवक जखमी झाले आहे. पावन कुमरे व लोकेश कुमरे असे अपघातात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.
१ सप्टेबर रोजी धानोरा वरून गडचिरोली ला सकाळी जात असताना दुचाकीचा अपघात होऊन रस्त्यावरील खड्ड्यामध्ये दोन युवक पडुन जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता धानोरा येथे ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले व पुढील उपचाराकरिता गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पवन कुमरे व लोकेश कुमरे हे दोघेही एमएच ३३ एई ५००२ या क्रमांकाच्या गाडीने धानोऱ्याहून गडचिरोलीला जात होते. दरम्यान राधेश्याम बाबा मंदिर जवळ असणाऱ्या खड्ड्यांमध्ये पडून अपघात झाला. अपघाताची माहिती गणेश कुळमेथे यांना मिळताच लगेच त्यांनी रुग्णवाहिका बोलावून ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे भरती करण्यात आले परंतु त्यांची प्रकृती स्थिर नसल्याने त्यांना गडचिरोली येथे हलविण्यात आले.
कठाणी नदी ला लागून संरक्षण भिंत बांधण्यात आली होती. ती संरक्षण भिंत पावसाने तुटून यावर्षी खड्डे पडले. कठानी नदीपासून ते राधेश्याम बाबा पर्यंत ची गाडी काढताना दुचाकी व चार चाकी वाहनांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्याचे वृत्त वारंवार वृत्तपत्रांमधून देऊनही संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत असून अजून किती लोकांचे अपघात होऊन बळी घेण्याचे वाट पाहत आहे बळी घेतल्यावरच याकडे लक्ष देईल का ? असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र अजून पर्यंत या समस्येची दखल कुणीही घेतली नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here