कोटगूल परिसरातील जनतेचा मुरुमगाव येथील विद्युत वितरण कंपनी कार्यालयाला घेराव

286

– कोटगूल येथील विद्युत वितरण उपकेंद्राचे काम सुरू करण्याची केली मागणी

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, २ सप्टेंबर : कोटगूल व परिसरातील जनतेने गुरुवार १ सप्टेंबर २०२२ ला मुरुमगाव येथील विद्युत वितरण उपकेंद्रवर हजारो च्या संख्येत मोर्चा काढून घेराव घातला.
कोरची तालुक्यातील कोटगूल येथे विद्युत प्रवाह सुरुवाती पासून मुरुमगाव येथील विद्युत वितरण कंपनी कार्यालयातील उपकेंद्रा मधून देण्यात येत आहेत. मुरुमगाव ते कोटगूल यातील अतंर्गत ५० कि.मी. मुरुमगाव उपकेंद्रात कोटगूल व परिसरातील ४८ लहाना- मोठे गाव समाविष्ट करण्यात आले आहेत. मुरुमगाव येथील विद्युत वितरण उपकेंद्राला परिपूर्ण सेवा नियमित देऊ शकत नाहीत त्यामुळेच कोटगूल वासीयानी स्वतंत्र विद्युत वितरण उपकेंद्राची मागणी केली होती व ती मागणी २०११ साली पूर्ण झाली असून त्यासाठी कोटगूल वासीयानी जागा उपलब्ध करून दिली आहे मात्र विद्युत वितरण उपकेंद्राचे काम सन २०११ मध्ये स्थगित ठेवण्यात आले व विद्युत वितरण कंपनी उपकेंद्र चे बांधकाम पूर्ण करण्यात आले नाही. या करीता कोटगूल व परिसरातील जनतेने काल गुरवार १ सप्टेंबर २०२२ ला हजारो च्या संख्येत भव्य मोर्चा काढत मुरुमगाव येथील विद्युत वितरण उपकेंद्रात घेराव केला. ‘एकच नारा आमची मागे पूर्ण करा’ मध्ये त्वरीत कोटगूल येथील विद्युत वितरण उपकेंद्राचे काम सुरू करण्याची मागणी करण्यात आली असता सबंधित विद्युत वितरण कंपनीकडून आलेले अधिकारी व कर्मचारी वर्ग यांना सुदधा घेराव करून कोटगूल येथे वेळेनुसार उपकेंद्राचे कार्य सुरू न झाल्यावर कोटगूल वासियाना ३ फेस परिपूर्ण जाळपोळ करण्याची परवानगी लिखीत स्वरुपात मागितली असता सबंधित विद्युत वितरण कंपनीकडून आलेले अधिकारी यांनी कोणतेही पत्र लिहून दिले नाही.
परंतू त्याना सविस्तर माहीती दिली की कोटगूल येथील विद्युत वितरण कंपनीकडून विद्युत वितरण उपकेंद्रा चे बांधकाम करीता निधी मंजूर झालेला आहे. संबंधित काम दोन कंत्राटदारांना देण्यात आलेला आहे. विद्युत वितरण उपकेंद्राकरिता निधी उपलब्ध आहेत व ७ करोड चा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तसेच हे विद्युत वितरण उपकेंद्राचे बांधकाम पवन इलेक्ट्रॉनिक चामोर्शी, व पद्मावती इलेक्ट्रॉनिक नागभीड या कंत्राटदारांना काम देण्यात आलेला आहे परंतु सध्या महाराष्ट्र सरकार निवडून नविन रित्या ने स्थापित झाल्यामुळे सध्या शासनाकडून होणारी विकास कामे स्थगित करण्यात यावे असे शासनाकडून आदेश पत्र मिळाल्याने कोटगूल येथील विद्युत वितरण उपकेंद्रा बांधकाम केव्हा सुरू होइल हे परिपूर्ण सांगता येत नाही. परंतु १५ दिवसात किवा १ महिन्यात बांधकामाची सूरवात होऊ शकते असे गडचिरोलीचे कार्यकारी अभियंता डोंगरवार, अतिरिक्त कार्यकारी अभियंता वाशिगंकर साहाय्यक अभियंता टिकार, धानोराचे उप कार्यकारी अभियंता शेंडे, धानोराचे साहाय्यक अभियंता गोरखिडै, चातगावचे कनिष्ठ अभियंता मेश्राम, मुरुमगावचे कनिष्ठ अभियंता चेतन लांडगे यांनी माहित दिली. मात्र तरीही आंदोलनकर्ते अधिकाऱ्यांच्या उत्तरावर संतुष्ट झाले नाही व आपले आंदोलन सुरु ठेवत पुढे ढकलले व मुरुमगाव येथील विद्युत वितरण उपकेंद्राच्या समोर तंबू बांधून काल रात्री मुक्काम केला.
या मध्ये मुरुमगाव पोलीस मदत केंद्रातील पोलीसानी सुध्दा आपली उपस्थित दश॔विली होती. त्याच प्रमाणेच राजस्व विभाग कोरची कडून पि.एस. धावत मडंळ अधिकारी व तहसील कार्यालय धानोराचे नायब तहसीलदार वाळके यांनी आपली उपस्थित दर्शवली असता २ सप्टेंबर ला चक्का जाम करण्याचा आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here