तेंदुपत्ता संकलनाकरिता गेलेल्या महिलांवर अस्वलांच्या कळपाचा हल्ला : चार महिला गंभीर जखमी

2708

– कुरखेडा तालुक्याती घटना

The गडविश्व
गडचिरोली : तेंदुपत्ता संकलनाकरिता जंगलात गेलेल्या मजुरांवर अस्वलांच्या कळपाने अचानक हल्ला केल्याने यात चार महिला जखमी झाल्याची घटना आज ७ मे रोजी सकाळच्या सुमारास घडली. सिमा रतिराम टेकाम (२१), लता जिवन मडावी (३५), पल्लवी रमेश टेकाम (२५), शमिला आनंदराव टेकाम (३८) सर्व रा. दादापूर ता. कुरखेडा असे जखमी असलेल्या महिलांचे नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, कुरखेडा तालुक्यातली दादापूर येथील महिला व पुरूष असा १४ जणांचा गट जंगल परिसरात तेंदुपत्ता संकलनाकरिता आज सकाळच्या सुमारास गेला होता. दरम्यान अस्वलांच्या कळपाने या मजुरांवर हल्ला केला यात चार महिला गंभीर जखमी झाल्या. आरडाओरड केल्याने आसपासचे मजूर धावून आल्याने अस्वलांच्या कळपाने घनस्थळावरून धुम ठोकली. सर्व जखमींना उपचाराकरिता तात्काळ उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच रामगडचे वनरक्षक रामपूरकर, मालेवाडाचे वनरक्षक तुलावी, डी.एम उईके यांनी रूग्णालयात भेट देवून जखमींची विचारपूर करून नेहमीप्रमाणे उपचाराकरिता आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here