तात्पुरत्या फटाका विक्री परवाना धारंकानी फटाका विक्री परवान्यासाठी नव्याने अर्ज करणे बंधनकारक

177

The गडविश्व
गडचिरोली, २४ सप्टेंबर : आगामी दिवाळी सणानिमित्य ज्यांना तात्पुरता फटाका साठवणुक व विक्री परवाना (पंधरा दिवसाच्या मुदतीकरीता) आवश्यकता आहे. त्यांनी जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांचे कार्यालयात ७ ऑक्टोंबर २०२२ पूर्वी आपला अर्ज विहित नमुण्यात सादर करावेत अश्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच वरील मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. जिल्ह्यातील सर्व तात्पुरत्या फटाका साठवणुक व विक्री परवानाधारकांनी फटाका साठवणुक व विक्री परवान्यासाठी नव्याने अर्ज करणे बंधनकारक राहील असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
अर्जासोबत कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.यात पोलीस अधिक्षक, गडचिरोली,संबंधित तहसिलदार,नगर परिषद/नगर पंचायत/ग्रामपंचायत यांनी अर्जदारांचे विनंती वरून Explosive Rules,2008 मधील अटी व शर्ती तसेच काविड-१९ बाबत शासनाद्वारे वेळोवेळी निर्गमीत केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन संबंधितास ना हकरत प्रमाणपत्र त्वरीत निर्गमित करावे .
आवश्यक कागदपत्र यात विहीत नमुन्यातील अर्ज (Form AE-5 मध्ये),पोलीस अधिक्षक यांचे कार्यालयातून तात्पुरता फटाका परवाना मंजूरीसाठी चारीत्र्य प्रमाणपत्र, संबंधित तहसिलदार यांचे कार्यालयातून तात्पुरत्या फटाका परवाना मंजूरीबाबत अहवाल व ना हरकत प्रमाणपत्र,नगर परिषद/नगर पंचायत/ग्रामपंचयतीचा अहवाल व ना हरकत प्रमाणपत्र, ज्या जागेवर फटाका विक्री करणार आहेत त्या ठिकाणच्या जागेचा/इमारतीचा नकाशा व अभिलेख, इमारत / खुली जागा स्वत:च्या मालकीची नसल्यास जमीन मालकाचे /घरमालकाचे संम्मतीपत्र,अर्जदाराचे 2 पासपोर्ट साईज फोटो,आधार कार्ड, सोबत जोडावे, असे जिल्हादंडाधिकारी,गडचिरोली यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here