दारूविक्री केल्यास ठोठावणार १० हजारांचा दंड

130

– नवरगाव ग्रापंचायत समितीचा निर्णय
The गडविश्व
गडचिरोली, २२ सप्टेंबर : कोरची तालुक्यातील नवरगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी मुक्तिपथ ग्रापं समितीने मोठा निर्णय घेतला आहे. आता गावपरिसरात अवैध दारूविक्री करतांना आढळून येणाऱ्यांवर १० हजारांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत सभागृहात आयोजित सभेत मुक्तीपथ ग्रामपंचायत समितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांचे वाचन करण्यात आले व समिती पुनर्गठन करण्यात आली. समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सहसचिव यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. याप्रसंगी कलम १८८, २७२, २७३, ग्रामपंचायत अधिनियम दारू बंदी कायदा, पेसा कायदा, अल्पवयीन मुलांचा संरक्षण कायदा, साथरोग कायदा, सुगंधित तंबाखू गुटखा बंदी कायदा, अन्न व औषध मानके कायदा इत्यादी कायद्याची अंमलबजावणी करून आपले गाव दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी काय करता येईल व व्यसनापासून कसे दूर राहता येईल, याबाबत मुक्तिपथ तालुका संघटिका निळा कन्नाके यांनी समजावून सांगितले. दरम्यान, गावातील अवैध दारू व तंबाखूविक्री बंद करण्यासाठी चर्चा करण्यात आली. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी दारूविक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
यावेळी सरपंच कौशल्या काटंगे, ग्रापं सदस्य मेहरसिंग भांगे, ग्रामसेवक एन.जी.कोडाप, विनोद होळी, राधेशाम दरवडे, संतोषी करमकार, लक्ष्मण मडावी, इजामसाय काटेंगे, चमरु होळी, सोमजी गावळे, मुख्याध्यापक काटेंगे, मुख्याध्यापक चिमणकर, मुख्याध्यापक यशवंत उंदीरवाडे, मुख्याध्यापक कमलेश मडावी, पोलिस पाटील सुखराम होळी, पोलिस पाटील सीताराम काटंगे, कुमरे, बलराम कलिका आदी उपस्थित होते.

Muktipath Gadchiroli Serch Ma Danteshwari Hospital Serch Chatgao

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here