गडचिरोली : ७ लाखांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त

290

– तंबाखू तस्करांच्या मुसक्या अवळण्यात कुरखेडा पोलीसांना यश
The गडविश्व
गडचिरोली : छत्तीसगड राज्यातून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती कुरखेडा पोलीसांनी मिळाली असता कुरखेडा पोलीसांनी सापळा रचून गोठणगाव नाक्यावर सात लाख ४६ हजार ८०० लाखांच्या सुगंधित तंबाखू व वाहतुकीकरिता वापरण्यात येणारे वाहन असा एकूण २६ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई मंगळवार ८ मार्च रोजी रात्रोच्या सुमारास केली. याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलीम माखाणी व साधू गावडे असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, छत्तीसगड राज्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती कुरखेडा पोलीसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे कुरखेडा पोलीसांनी गोठनगाव नाक्यावर सापळा रचला. दरम्यान रात्रो ९.३० वाजताच्या सुमारास दोन चारचाकी वाहन संशयित रित्या येतांना दिसले असता वाहनांना थांबवून झडती घेतली. यावेळी वाहनांमध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. या प्रकरणी पोलीसांनी सुगंधित तंबाखू किंमत ७ लाख ४६ हजार ८०० रुपये व त्याची वाहतूक करण्यात वापरण्यात आलेले वाहन असा एकूण २६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाईमुळे अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
सदर कारवाई कुरखेडाचे उपविभागीय पोलिस अधिकारी साहिल झरकर, ठाणेदार अभय आष्टेकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक नारायण शिंदे, पोलिस कर्मचारी ललित जांभुळकर, नितीन नैताम,रुपेश काळबांधे, कन्नाके आदींनी पार पाडली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here