गडचिरोली : बेतकाठी येथील तलाठी अडकला एसीबीच्या जाळ्यात

3421

– १५ हजारांची स्विकारली लाच
The गडविश्व
गडचिरोली, १३ ऑक्टोबर : आपल्या कार्यक्षेत्रातुन गिट्टी खदान माल वाहतुक करण्याच्या कामाकरीता व सोडलेल्या टिप्परचे पैसे याकरिता २० हजार रूपयांची मागणी करून १५ हजार रूपयांची लाच रक्कम स्विकारतांना कोरची तालुक्यातील बेतकाठी येथे कार्यरत असलेल्या तलाठी नरेंद्र रामचंद्र ठाकरे (४४) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तलाठी कार्यालय बेतकाठी येथे रंगेहाथ पकडले.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदारास १० ऑक्टोबर रोजी सोडलेल्या टिप्परचे १० हजार रूपये व टिप्पर, ट्रक्टर ने तलाठी कार्यालय बेतकाठी या आपल्या कार्यक्षेत्रातून गिट्टी खदान माल वाहतुक करण्याच्या कामाकरिता महिना १० हजार रूपये असे एकुण २० हजार रूपयांची मागणी तलाठी नरेंद्र रामचंद्र ठाकरे यांनी केली. मात्र तक्रारदार यास सदर रक्कम देण्याची इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे तक्रार दाखल केली असता सापळा कारवाई दरम्यान पंचासमक्ष सुस्पष्ट मागणी करून १५ हजार रूपयांची लाच रक्कम तलाठी कार्यालय बेतकाठी साजा क्र. ९ मध्ये स्विकारतांना तलाठी नरेंद्र रामचंद्र ठाकरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथाकाने रंगेहाथ पकडले. याबाबत तलाठी तलाठी नरेंद्र रामचंद्र ठाकरे विरोधात पोलीसा स्टेशन कोरची येथे कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई लाप्रवि गडचिरोलीचे पोनि शिवाजी राठोड, पोनि श्रीधर भोसले, पोना राजेश पदमगिरवार, पोना श्रीनिवास संगोजी, पोशि संदीप उडाण, पोशि संदिप घोरमोडे, चापोहवा तुळशिराम नवघरे यांनी केली. ©©

#acb trap #acb #gadchiroli news #gadchiroli police #talathi #the gadvishva #narendra thakre #betkathi #korchi #talathi #acb jalyat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here