ऐन समोर बिबट्या असतांनाच मचाण कोसळली…

1094
File Photo

– नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील बुद्ध पौर्णिमेच्या रात्रीची घटना
The गडविश्व
गोंदिया : गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील नागझिरा व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेच्या रात्री वन्यप्राणी गणनेदरम्यान ऐन समोर बिबट्या असतानाच मचाण तुटून खाली कोसळ्याने दोन पर्यटक जखमी झाले झाल्याची घटना घडली.
वन्यजीव विभागाच्यावतीने कोरोनाकाळानंतर पहिल्यांदाच यावर्षी वन्यप्राणी गणनेसाठी पर्यटकांना संधी देण्यात आली होती. निर्धारित नियोजनानुसार पर्यटक हे वन्यजीव विभागाने सोबत दिलेल्या वनमजुरांसोबत रात्रीला मचाणीवर गेले. दरम्यान सोमवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास पिटेझरी गेटपासून काही अंतरावर असलेल्या चुनाभट्टी परिसरातील एका मचाणासमोरील पाणवठ्यावर बिबट आला. या दरम्यान मचाण तुटल्याने २ पर्यटकांसह वनमजूर खाली कोसळल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच जखमींना रात्री १२.३० वाजताच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सत्येंद्र शाहू रा. रायपूर, सचिन थंपी रा. हैद्राबाद असे जखमींची नावे आहेत.
मचाणींची व्यवस्थित बांधणी न झाल्याने सदर घटना घडल्याचे पर्यटकांसह नागरिकांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर वन्यजीव विभागात चांगलीच तारांबळ उडाली आहे तर पर्यटकांचे वजन अधिक असल्याने मचाण कोसळल्याचे कारण वनविभागाकडून पुढे केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here