अवैध दारूविक्री विरोधात महिलांचे नगराध्यक्षांना निवेदन

198

The गडविश्व
गडचिरोली : चामोर्शी शहरातील काही वार्डात सुरु असलेल्या अवैध दारूविक्री विरोधात शहरातील महिलांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षाना निवेदन सादर केले. नगर पंचायत निवडणुकीत आपण दिलेल्या वचना प्रमाणे, प्राथमिकता देवून अवैध दारूविक्री त्वरित थांबवा, अशी मागणी महिलांनी यावेळी केली. यासाठी नगर पंचायतीतर्फे नगर दारूमुक्तीचा प्रस्ताव पारित करून दारूबंदीच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन व पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करा. नगरसेवकांच्या मदतीने प्रत्येक वार्डात दारू व्यसनींच्या उपचारासाठी व्यसन उपचार क्लिनिकचे आयोजन करा. असे निवेदनात म्हंटले आहे.
चामोर्शी शहरातील काही वार्डात मिळत असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे सर्वात जास्त त्रास महिलांना सहन करावा लागतो. शहरात दारू उपलब्धीमुळे कमी वयाचे मुले, तरूण दारूकडे वळत आहेत, व्यसनी होत आहेत. शहरातील काही वार्डात अवैध दारू विक्री पूर्णत: बंद झाल्यास पुरुषांमधील दारू पिणे बंद होईल, घरात, वार्डात होणारे भांडण तंटे कमी होतील. शहरातील गुन्ह्यांच्या संख्येत घट होईल. त्यामुळे अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी सहकार्य केल्यास नगराचा विकास करण्यास जनतेची चांगली साथ मिळेल. अशी मागणी चामोर्शी शहरातील विविध वार्डातील महिलांनी शहराच्या नगराध्यक्षा यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष जयश्री वायलालवार यांनी अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी सहकार्य करण्याचे सांगितले. यावेळी नगरसेवक ऍड. प्रेमा आईंचवार, वर्षा भिवापुरे, रोशनी वरघंटे, काजल नैताम, स्नेहा सातपुते, गीता सोरते, सोनाली पिपरे, माधुरी व्याहाड़कार, वंदना गेडाम आदी मंडळी, तसेच मुक्तिपथच्या वतीने तालुका संघटक आनंद इंगळे व आनंदराव सिडाम उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here