३ ला सर्चमध्ये वेदना व्यवस्थापन ओपिडी

236

– मुंबईचे तज्ञ डॉ. जितेन्द्र जैन करणार रुग्णांची तपासणी
The गडविश्व
गडचिरोली, १ सप्टेंबर : शरीराचे दुखणे हाताळणे कठीण होऊ शकते आणि जर लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे परिणाम धोकादायक असू शकतात. अशावेळी डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेणे महत्त्वाचे आहे. गडचिरोली जिल्ह्यातील रुग्णांची संख्या बघता व मागील महिन्यात झालेल्या ओपिडीला रुग्णांचा प्रतिसाद बघता सर्च येथील माँ दंन्तेश्वरी दवाखान्यात ३ सप्टेंबर ला वेदना व्यवस्थापन ओपिडी राहणार आहे. ही ओपीडी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी होणार आहे.
या ओपीडीचे मार्गदर्शन मुंबईचे तज्ञ डॉ. जितेन्द्र जैन हे करतील. या ओपीडीमध्ये पाठीचा कणा दुखणे, पाठदुखी, मज्जातंतू वेदना, लंबर स्पॉन्डिलायसिस: सकाळी कडकपणा, पाठीत वेदना, जास्त वेळ बसून राहिल्यास पाठ दुखणे, वाकताना किंवा उचलताना वेदना होणे, मानेचा स्पॉन्डिलायसिस: डोक्याच्या मागील बाजूस डोकेदुखी होणे या सर्वांचा उपचार होईल. तसेच पाय आणि हातांमध्ये अशक्तपणा आणि अवघडलेपणा येणे, मानेत कडकपणा जाणवणे, तोल गेल्यासारखे वाटणे, खांद्यापर्यंत मानेच्या वेदना होणे. पाय आणि खांद्यांमध्ये बधिरपणा येणे, आतडी आणि मूत्राशयावर ताबा ठेवण्यास कठीण होणे, मागे वाकताना पाठीच्या मध्यभागी वेदना होणे, पाठीच्या कण्याची मागे पुढे हालचाल होताना वेदना होणे, टाचेचे दुखणे, डोकेदुखी, नागिण (एक त्वचारोग) यामुळे होणाऱ्या वेदना तसेच शस्त्रक्रिया झाल्यानंतरच्या वेदना या सर्वांवर उपचार होईल. या वेदना व्यवस्थापन ओपिडीचा लाभ घेण्यासाठी रुग्णांना नोंदणी करण्याचे आवाहन सर्चच्या व्यवस्थापनाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here